वेळ ही अशी एक अमूल्य गोष्ट आहे की जी एकदा गेल्यावर परत येत नसते. गेलेली संपत्ती आपण परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच संत कबीर म्हणून गेले आहेत कल करे सो आज कर, आज करे सो अब यासाठी वेळेचे महत्व जाणून माणसाने त्याप्रमाणे वागणे अत्यंत आवश्यक आहे.
रेल्वे जशी कोणासाठी थांबत नाही, ती आपल्या ठराविक वेळेवर सुटतेच, तसेच वेळही कोणासाठी थांबत नाही वेळ एकदाच येत असते. संधी एकाच मिळते. एकदा संधी हातातून गेली तर पुन्हा येत नसते. तेव्हा वेळचा आपण सदुपयोग करायला हवा. मुलांना टिवल्याबावल्या करीत वेळ घालवणे आवडते. त्यांचा वेळ हातातल्या वाळू सारखा सरकत असतो. ते त्यांच्या लक्षात येत नाही. मग परिक्षा जवळ आल्या की ते घाबरतात. "आपला कितीतरी अभ्यास करायचा राहीला आहे. असा पश्चाताप करत बसतात. पण आता त्याचा काहीच फायदा नसतो. कारण अभ्यास करायची वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी वेळच्या वेळच्या वेळी शाळेत जाणे. वेळी गृहपाठ करणे, योग्य वेळी झोपणे, उठणे अशा त-हेची शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे.
वेळेचा योग्य वापर करणे. वेळेचा योग्य वापर करणारे लोकच जीवनात ठरवलेले काही ध्येय प्राप्त काळ शकतात. मुर्ख माणसे आपसात व भांडणात वेळ वाया घालवितात. अश्या लोकांचे आयुष्य व्यर्थ जाते. गेलेली वेळ परत येत नाहीं हे जीवनातले एक सत्य आहे. पंडीत नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले अशी सारी मोठी माणसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उपयोगात आणत असत. त्यामुळेच ते जीवनात आपले ध्येय प्राप्त करू शकले.
गेलेले बालपण, गेलेले तारुण्य पुनः परत मिळनार नसते. तेव्हा वेळचे महत्त्व जाणून माणसाने त्याचा सदुपयोग करून सतत कार्यरत राहीले पाहिजे यातच माणसाच्या जीवनाचे सार्थक आहे.
अबोली राम गवळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव
इयत्ता सातवी
खूप मस्त.. छान लेखन जीवन यशस्वी व्हायचे असेल तर वेळ महत्त्वाचे आहे
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete