योग हा भारताचा प्राचीन वारसा आहे. शरीर आणि मन यांचा संतुलित विकास करणाऱ्या योगाचे महत्व खूप आहे. म्हणूनच 21 जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
2014 साली भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिन साजरा करण्याची सकल्पना मांडली आणि ती स्वीकारली गेली. 21 जून 2015 पासून योग दिवस दरवर्षी साजरा केला जातो. शोग केल्याने आपले शरीर निरोगी राहते, मन शात राहते आणि एकाग्रता वाढते.
आजारापासून बचाव होतो. दररोज योग केल्यास शारीरिक व मानसिक तणाव दूर होतो. योग हा फक्त व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालये, संस्था इ.ठिकाणी सामूहिक कार्यक्रम घेतले जातात. लोकाना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रदर्शन, शिबिरे, मार्गदर्शन इ. कार्यक्रम आयोजित केले जातात.
आपण सर्वांनी रोज योग करणे व इतरांनाही प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. योग हे आरोग्याचे रहस्य आहे, त्यामुळे भारतीय संस्कृती मध्ये योगाला खूप महत्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो..
संजना राठोड ..
इयत्ता 7 वी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर..
No comments:
Post a Comment