Tuesday, September 2, 2025

आईसाहेब ..आईचे महत्व

 पोट माझ भराव म्हणून उपाशी ती राही

 झोप मला यावी म्हणून जागी ती राही

 भविष्य माझं घडाव म्हणून... संतत राबत ती राही

 मला कशाशीच भीती नसावी

म्हणून.. माझा पाठीशी खंबीर उभी ती राही

 आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई है प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व आहे.


माझी आई सर्वस्व आहे. ती माझी गुरु ,मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते. आमच्या कुटुंबातील सर्वांचेकाळजी घेते. माझी आई माझ्यावर चांगले संस्कार केले,मला चांगले काय आणि वाईट काय हे समजावून सांगते. माझी आई मला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवते.


ती खूप प्रेमळ, कष्टाळू व समजूतदार आहे .मी आजारी असताना ती माझी खूप काळजी घेते. गोरगरीब गरजुनाही ती वेळोवेळी मदत करते. माझी आई मला नेहमी ती माझी प्रेरणा आहे.

आई ही आई असते. दुधावरची साई असते बाहेरून कठोर असते पण


आतून मात्र मऊ असते रागवते पण  ती समजून ही सांगते ती कोनाची दुश्मन नसते ना कोणाची वेरी

सगळ्या साठी तीची माय एकच असते.


संस्कृती संदीप सरगडे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर 

इयत्ता सातवी

1 comment:

श्रमिकांचे महत्व...

  श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आप...