भारतातील सामाजिक समतेसाठी झालेल्या अनेक आंदोलनांपैकी चवदार तळे सत्याग्रह हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक टप्पा मानला जातो. २० मार्च १९२७ रोजी महाराष्ट्रातील येथे हा सत्याग्रह झाला. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
त्या काळात भारतीय समाजात अस्पृश्यता प्रथा अत्यंत तीव्र होती. दलित समाजातील लोकांना सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, तळी यांचा वापर करण्यास मनाई होती. चवदार तळे हे महाड शहरातील एक सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत होते, परंतु दलितांना त्याचा उपयोग करण्यास बंदी होती. या अन्यायकारक प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी हा सत्याग्रह आयोजित केला.
या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी चवदार तळ्याचे पाणी पिऊन आपला हक्क सिद्ध केला. हा केवळ पाणी पिण्याचा प्रश्न नव्हता, तर तो समानता, स्वाभिमान आणि मानवाधिकारांचा लढा होता. या घटनेने समाजात मोठी खळबळ उडाली आणि अस्पृश्यतेविरुद्धची चळवळ अधिक बळकट झाली.
चवदार तळे सत्याग्रहामुळे दलित समाजात आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत झाला. त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा घेतली. पुढे या आंदोलनाने सामाजिक सुधारणांच्या अनेक चळवळींना दिशा दिली.
आजही चवदार तळे सत्याग्रह आपल्याला समानता, बंधुता आणि न्याय यांचे महत्त्व सांगतो. समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळणे हेच खरे लोकशाहीचे तत्त्व आहे, हे या सत्याग्रहातून स्पष्ट होते.
चवदार तळे सत्याग्रह हा केवळ एक आंदोलन नसून सामाजिक क्रांतीची सुरुवात होती. तो भारतीय समाजातील समतेसाठी लढलेल्या महान संघर्षाचे प्रतीक आहे.
गीतांजली गांधले
इयत्ता सातवी