दिवाळी
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी या सणाला दिपावली असेही म्हणतात. हा सण दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो
दिवाळी हा सण धनत्रयोदशी ते भाऊबीज पर्यंत पाच दिवसांचा सण असतो. दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येस परतले होते. त्यावेळी तेथील लोकांनी सर्वत्र दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. तेव्हापासून दिवाळी हा सण दिवे लावून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळी सणाप्रसंगी सर्वजन लवकर उठून सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. नवनवीन कपडे घालतात. घरासमोर सुंदर रांगोळी काढतात. घरोघरी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा असे फराळाचे पदार्थ बनवले जातात. फराळाचे पदार्थ, एकमेकांना देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात. नवीन कपडे व नवीन वस्तू खरेदी केल्या जातात.
दिवाळी हा दिसांचा तसेच प्रकाशाचा सण आहे. या सणाला सर्वत्र रोषणाई केली जाते. दुकाने, बाजारपेठा आकर्षक वस्तूंनी सजवल्या जातात. घरात, अंगणात दिवे, पणत्या, आकाश कंदील लावले जातात. फटाके वाजवले जातात. वार्तावरण खूप प्रसन्न असते.
दिवाळीला मुलांना सुट्टी असते. मुलांना फराळाचे पदार्थ खायला व फटाके वाजवायला खूप आवडते. मुले घरासमोर सुंदर किल्ले बांधतात.
दिवाळी या सणांमुळे समाजात ऐक्य निर्माण होते. दिवाळीला संध्याकाळी घर दिवे, पणत्या, मेणबत्यांनी उजळवले जाते. रात्री मनोभावे लहरी मातेचे पूजन केले जाते.
सर्वांना दीपावली सण खूप आवडतो .
नाव:- रागिनी सुरेंद्र गौतम शाळेचे नाव: जि. प. प्राथमिक शाळा सुभाषनगर
No comments:
Post a Comment